Tiger Shroff च्या पहिले वहिले गाणे Unbelievable चा टीजर आला समोर, 'या' दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला
Tiger Shroff (Photo Credits: Instagram)

डान्स (Dance) आणि अॅक्शनच्या (Action) बाबतीत अव्वल असलेला आणि लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आता लवकरच एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. आपल्या डान्सने सर्वांवर भुरळ पाडलेला हा अभिनेता आता आपले पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. डान्स आणि अॅक्शन हिरो म्हणून ओळखलं मिळाल्यानंतर आता गायक (Singer) म्हणूनही आपली वेगळी ओळख बनवायला टायगर सज्ज झाला आहे. नुकताच त्याने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल्या 'Unbelievable' गाण्याचे टीजर प्रदर्शित केले आहे.

या टीजरला लोकांनी पसंत केले असून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) या टीजरला 5 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या टीजरवरुन त्याच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. दिशा पटानी ने बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ च्या कुटूंबासोबत साजरं केलं आपल्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन, पाहा फोटोज

या गाण्याचे प्रदर्शित करुन त्याखाली टायगर ने लिहिले आहे की, 'मित्रांनो हे माझ्या पहिल्या गाण्याचे टीजर आहे. आशा आहे तुम्हा सर्वांना हे नक्की आवडेल. एवढच सांगतो #YouAreUnbelievable.'

हे गाणे येत्या 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफसह त्याचे चाहतेही या गाण्याला घेऊन तितकेच उत्सुक आहेत. बिग बँग म्यूजिक या गाण्याचे निर्माते आहेत. तर डीजी मायने आणि अवितोश यांनी हे गाणे लिहिले आहे. पुनीत मल्होत्रा आणि परेश यांनी मिळून हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

टायगर श्रॉफ याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लवकरच तो आपल्याला 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसेल. लॉकडाऊन आधी प्रदर्शित झालेला त्याचा 'बागी 3' हा सिनेमा लॉकडाऊन मुळे चांगली कमाई करु शकला नाही.