दिशा पटानी ने बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ च्या कुटूंबासोबत साजरं केलं आपल्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन, पाहा फोटोज
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ (फोटो सौजन्य- Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (DIsha Patani) ने 13 जून ला आपला वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊन मुळे घरातच आपल्या बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ (Tiger Shroff) च्या परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा केला. तिचा हा दिवस चांगला जावा म्हणून टायगर श्रॉफ ने बर्थडे सेलिब्रेशनची खास तयारी केली होती. दिशा पटानी हा वाढदिवस चांगला लक्षात राहावा यासाठी टायगर आणि त्याच्या संपूर्ण कुटूंबाने एकत्र येऊन त्याला खास सरप्राईज गिफ्ट दिलं.

टायगर ची बहिण कृष्णा (Krishna Shroff) आणि दिशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघी सोशल मिडियावर आपले बरेच व्हिडिओज शेअर करत असतात. त्यामुळे कृष्णा श्रॉफ हिनेही दिशाला वाढदिवासाच्या खास शुभेच्छा दिल्या. कृष्णा ने दिशासाठी खास सरप्राईज केक आणला होता. या केकवर दिशाचा आवडते कार्टून पात्र 'नारूतो' चा फोटो आहे.

Disha Patani And Krishna Shroff (Photo Credits: Instagram)

 

View this post on Instagram

 

Who Does Better 😁 #DishaPaatni #KrishnaShroff #AyeshaShroff #Saturday #weekendvibes ❤️😍

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

काल दिशाच्या वाढदिवसानिमित्त या दोघींनी खूप धमालमस्ती केली. बुमरँग व्हिडिओ बनवून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या पोस्ट खाली, 'हॅप्पी बर्थडे टू माय सिस्टर फ्रॉम अनदर मदर, लव यु डी' असे लिहिले आहे. दिशा पटानी हिने वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरे यांचे उत्तर; पहा काय म्हणाले (View Tweet)

 

View this post on Instagram

 

3 waffles and 3 pancakes later 😂...happy birthday rockstar❤️ @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

कृष्णा सोबत तिच्या आईनेही दिशासह टिकटॉक व्हिडिओ बनवला आहे. तर टायगर श्रॉफ ने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मजा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट करुन त्याखाली, "तीन वेफेल्स आणि तीन पॅनकेक खाल्ल्यानंतर बाद हॅप्पी बर्थडे रॉकस्टार." असे लिहिले आहे.