दिशा पटानी हिने वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरे यांचे उत्तर; पहा काय म्हणाले (View Tweet)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने देखील खास फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर ट्विट करुनही दिशाने आदित्यांना बर्थडे विश केले. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी रिट्वीट करत उत्तर दिले आहे.

दिशा पटानी हिने वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरे यांचे उत्तर; पहा काय म्हणाले (View Tweet)
Aditya Thackeray and Disha Patani (Photo Credits: PTI/Instagram)

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा 13 जून रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आदित्य यांच्यावर नातेवाईक, मित्रपरिवार आणि चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने देखील खास फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर ट्विट करुनही दिशाने आदित्यांना बर्थडे विश केले. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी रिट्वीट करत उत्तर दिले आहे. (आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री दिशा पटानी ने शेअर केला 'हा' खास फोटो, हटके स्टाईलने दिल्या शुभेच्छा)

दिशाला धन्यवाद देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी लिहिले, "थॅक्यू यु सो मच दिशा! 13 जून रोजी तुला देखील सेम टू यू म्हणणाऱ्या लोकांपैकी मी एक. किप शायनिंग आणि रायजिंग!" आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 13 जून रोजी असतो. त्यामुळे दिशाला ही आदित्य यांनी 'Same To You' म्हणत बर्थ विश केलं. तसंच उज्ज्वल भविष्यासाठी 'Keep shining and rising!' म्हणत शुभेच्छा दिल्या.

Aaditya Thackeray Tweet:

आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिशाने ट्विटमध्ये लिहिले, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू जसा अमेझिंग आहेस तसाच रहा आणि चमकत रहा." त्यासोबतच स्माईली आणि हार्ट इमोजी देखील पोस्ट केला होता. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी रिट्वीट करत उत्तर दिले आहे.

दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांच्या डिनर डेटनंतर त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यामुळे दोघांच्या नावची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान दिशाने मुलाखतीत आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक करत राजकीय कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनी आम्ही दोघं चांगले मित्र असल्याचे मुलाखतीत सांगितले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2020 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).