Tiger Shroff (Photo Credits: Instagram)

हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. इतकेच नव्हे तर अनेक तरुण त्याची डान्स स्टाईल, त्याचा लूक थोडक्यात त्याच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतात. अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा असला तरी त्याच्या डान्स स्टाईल (Dance Style), अॅक्शन स्टंट्स (Action Stunts) आणि अभिनयाने (Acting) त्याने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. टायगर श्रॉफच्या धमाकेदार आणि काळजाचा ठोका चुकवणा-या स्ंटट्समुळे त्याने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यात त्याच्या पिळदार देहयष्टीचीही बरीच चर्चा होत असते. नुकताच टायगरने त्याचा वर्कआऊट (Workout) करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लाखो तरुणी घायाळ होणार याबाबत तिळमात्र शंका नाही.

या व्हिडिओमध्ये टायगरने काळ्या रंगाची बॉडी घातली असून त्याने आपल्या दोन्ही हातात भारी वजनाने डंबल्स उचचले आहेत. जिममध्ये व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ आहे.

हेदेखील वाचा- Tiger Shroff's Song Unbelievable Out: टायगर श्रॉफ चे नवे गाणे 'अनबिलीवेबल' अखेर झाले प्रदर्शित, आवाज ऐकून व्हाल मंत्रमुग्ध

 

View this post on Instagram

 

Cheat day pumps are an unbelievable feeling🦍🦧

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, डान्स आणि स्ंटट्समध्ये अव्वल असणा-या टायगर श्रॉफच्या आवाजातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. टायगरच्या Unbelievable हे गाणे चाहत्यांनी प्रचंड पसंत केले असून आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

त्यामुळे टायगर आता चित्रपटांमध्ये गातानाही दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टायगरचा हा अंदाज त्याचा चाहत्यांना फार आवडल्याचे एकूणच या गाण्याला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक्स वरुन कळतय.