The Kashmir Files: कपिल शर्मावर भडकले चाहते; मोठा स्टार नसल्याने 'द काश्मीर फाइल्स'च्या टीमला शोमध्ये बोलावण्यास नकार, दिग्दर्शक Vivek Agnihotri चा दावा
Kapil Sharma (Photo Credits: Instagram)

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट सिनेगृहात दाखल होणार आहे. या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन यांनी त्याची पुष्टी केली आहे. कोणताही चित्रपट आला की, चित्रपटाचे प्रमोशन जोरात केले जाते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचतात.

अशा परिस्थितीत कपिलच्या शोमध्ये 'द काश्मीर फाइल्स'ची टीम पाहण्याची चाहत्यांना खूप दिवसांपासून इच्छा होती. पण या चित्रपटाची टीम शोचा भाग होऊ शकली नाही. त्याचे कारण आता समोर आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक यांनी नुकतेच ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्या टीमला कपिल शर्मा शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार देण्यात आला कारण त्यांच्या चित्रपटात एकही मोठा व्यावसायिक स्टार नाही.’

या खुलाशानंतर 'द कपिल शर्मा शो'वर चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. कपिल शर्मावर सोशल मिडियावर प्रचंड टीका होत आहे. विवेकने आजच्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'कपिल शर्माच्या शोमध्ये कोणी जायचे आणि कोणी नाही हे त्या शोचे निर्माते ठरवतात मी नाही. अमिताभ बच्चन एकदा म्हणाले होते की, ‘वो राजा हैं हम रंक’

विवेकचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 'द काश्मीर फाइल्स'च्या टीमला चाहते पूर्ण पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे कपिल टीकेचा धनी झाला आहे. नुकतेच काश्मिरी पंडितांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. (हेही वाचा: Jhund: केदार शिंदे यांचं 'झुंड'विषयीचं ट्विट चर्चेत, प्रक्षेकांना झुंड चित्रपट पाहण्याचे केले आवाहन)

दरम्यान, अलीकडेच विवेक अग्निहोत्रीने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करत बॉलीवूडच्या एका टोळीविरुद्ध भाष्य केले होते. विवेकने लेखक, पत्रकार आणि विधू विनोद चोप्रा यांची पत्नी अनुपमा चोप्रावर नाराजी व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की, अनुपमाने मुद्दाम त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन केले नाही.