स्वरा भास्करने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले ट्रोल, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टीका
स्वरा भास्करने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले ट्रोल, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टीका (Photo Credits-Twitter,Edited)

बॉलिवूड कलाकार स्वरा भास्कर (Swara Bhaskar) बहुधा सोशल मीडियावर राजकरणाबाबतच्या मुद्द्यांवर नेहमीच लिहित असते.तर नुकतेच तिने एक ट्वीट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर एअर स्ट्राईच्या (Air Strike) मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. त्यामुळे स्वरा सोशल मीडियावर ट्रोल झाली असून काही जणांची तिच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

रिपोर्टनुसार मोदी हे एअर स्ट्राईकच्या दिवशी रात्रभर जागून याबाबत सतर्क राहत होते. मात्र स्वराने आपल्या ट्वीट मध्ये असे लिहिले आहे की, मोदी यांच्या कामाचा हा एक भाग असल्याने त्यांना अधिक गुण देण्यात यावे असे तिने म्हटले आहे. मात्र नेटकऱ्यांनी स्वराने केलेल्या ट्वीटबद्दल संताप व्यक्त करत तिला तिच्या कामाची आठवण करुन दिली आहे.

तर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याचसोबत बॉलिवूड मधील कलाकारांनीही भारतीय वायुसेना आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.