रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने गेल्या महिन्यात आपल्या घरी गळफास लावून घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी जवळजवळ 30 पेक्षा अधिक जणांनी आपला जबाब नोंदवला आहे. त्याचसोबत या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच दरम्यान सुशांत सिंह याची मैत्रीण रिया चक्रवती (Rhea Chakraborty) हिने सुद्धा सुप्रीम कोर्टात सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल केली होती. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया हिने मौन सोडले आहे. कारण सुशांतच्या आत्महत्येस रियाच दोषी असल्याचे आरोप तिच्यावर लावण्यात आले आहेत. यामुळे रिया हिने आता या संदर्भात एक व्हिडिओ जाहीर करत स्पष्टीकरण दिले आहे.(सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली)

रिया चक्रवर्ती हिने व्हिडिओत असे म्हटले आहे की, 'मी देवावर आणि न्यायावर खुप विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मला न्याय जरुर मिळेल. सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होईल.'(सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी अंकिता लोखंडे हिने केला गौप्यस्फोट; म्हणाली 'तो कधीच डिप्रेशनमध्ये नव्हता')

तर सुशांतचे वडील के. के. सिंह  यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती  विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. सुशांतचे केस लढणारे वकील विकास सिंह  यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया विकास सिंह यांनी दिली आहे.