Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु सुशांतच्या आत्महत्येपाठी आता दिवसागणिक नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. नुकत्याच सुशांत याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पोलीसात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. तसेच बहुतांश जणांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशी करावी असे म्हटले होते. याच दरम्यान आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी या संदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सुशांत याच्या निधनानंतर ते आतापर्यंत जवळजवळ 37 जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी प्रत्येक अॅंगलने तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर रिया चक्रवर्ती हिने सुप्री कोर्टात याचिका दाखल केली होती. या व्यतिरिक्त सुशांत याच्या वडिलांकडून वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी कॅविएट सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. त्याचसोबत रिया चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे.(Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी FIR दाखल केल्यावर रिया चक्रवर्ती झाली गायब? जाणून घ्या सविस्तर)

गेल्या महिन्यात 14 जुनला सुशांत याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. सुशांतच्या करियर बाबत बोलायचे झाल्यास टीव्ही 'सीरियल किस देश मे है मेरा दिल' येथून सुरुवात केली होती. त्यानंतर तो 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमातून मुख्य भुमिकेत दिसून आला होता. तर बॉलिवूडमधील त्याच्या कामाबाबत सांगायचे झाल्यास त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.