सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी अंकिता लोखंडे हिने केला गौप्यस्फोट; म्हणाली 'तो कधीच डिप्रेशनमध्ये नव्हता'
Sushant Singh Rajput And Ankita Lokhande (Photo Credit: Twitter)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborty)  एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर आता या तपासात अनेक ट्विस्ट येत आहेत. बिहार पोलीस सध्या मुंबईमध्ये असून प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या बँक स्टेटमेन्टबाबतचा पुरावा सादर केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंड (Ankita Lokhande) हिने रिपब्लिक टिव्हीशी बोलताना असे सांगितले आहे की, "सुशांत खूप मनमेळाऊ व्यक्ती होता. नेहमी आनंदी असणारा सुशांत डिप्रेशनमध्ये असूच शकत नाही."

याबाबत अधिक माहिती देताना अंकिता म्हणाली, "सुशांत सारखा स्वप्न बघणारा मुलगा तिने आजपर्यंत पाहिला नाही. सुशांतकडे एक डायरी आहे ज्यात त्याने पुढील 5 वर्षांचे प्लान्स लिहिले होते. करिअरमध्ये तो खूप यशस्वी होता. त्यामुळे तो एस पाऊल कधी उचलूच शकणार नाही. हे काहीतरी वेगळच प्रकरण आहे."

हेदेखील वाचा- Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतच्या पैशांवर रियाने केली चैन? सुशांतचे कोट्यावधी रुपये रियाच्या वैयक्तिक गोष्टींसाठी खर्च, बँक स्टेटमेन्टमधून धक्कादायक माहिती उघड

"सुशांत अनेक दु:खी व्हायचा. मात्र तो कधी डिप्रेस असू शकत नाही. त्यामुळे लोकांनी त्याला तो डिप्रेशनमध्ये होता असे बोललेलं मला आवडणार नाही. उलट लोकांनी त्याला असं लक्षात ठेवलं पाहिजे, जो छोट्या शहरातून येऊन आपली स्वप्ने पूर्ण करुन गेला. मुळात तो एक प्रेरणादायी व्यक्ती होता." असंही ती पुढे म्हणाली.

अंकिताने आपल्या मुलाखतीत सांगितले की, "सुशांत अनेकदा तिला प्रोत्साहन द्यायचा. तो एक भावूक व्यक्ती होता. एक छोट्या बाळासारखा होता. छोट्या छोट्या गोष्टींत खुश असायचा." अंकिताच्या या गौप्यस्फोटाने या प्रकरणाला एक वेगळच वळण लागलं आहे.