Sushant Singh Rajput And Ankita Lokhande (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी आज आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ज्यामुळे सिनेसृष्टीतील प्रत्येकजण धास्तावून गेले आहे. अभिनेत्री सुशांत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. परंतू, काही वर्षापूर्वी त्यांचा ब्रेक झाला होता. यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर झाले होते. मात्र, आज सुशांतने आत्महत्या केल्याचे कळताच अंकिता लोखंडेला जबरदस्त धक्का बसला आहे. सुशांत सिंह याने आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडेला सुशांत सिंहच्या आत्महत्येची माहिती एका फोनद्वारे मिळाली होती. ज्यावेळी अंकिताला सुशांतने आत्महत्या केल्याचे समजले, तेव्हा ती जोरात फक्त ‘काय’ म्हणून ओरडली आणि लगेच तिने फोन ठेवला. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत सुशांत आणि अंकिताने सोबत काम केले आहे. याचदरम्यान, दोघांचे प्रेम जुळले होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअप झाला आणि ते दोघेही वेगळे झाले होते. मात्र, आज अचानक सुशांतच्या आत्महत्येची बातमी मिळताच तिला धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Dies of Suicide: सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.