बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. त्याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत एकाच खळबळ उडाली आहे. सुशांत याचा अखेरचा चित्रपट दिल बेचारा 8 मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. यामुळे येत्या काही दिवसांतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. परंतू, आज अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहली आहे. हे देखील वाचा-Sushant Singh Rajput's Demise: सुशांत सिंह राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होत.