MS Dhoni Retires: महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत दिवंगत सुशांत सिंह राजपूत सांगितली होती 'ही' मोठी गोष्ट; Watch Video
Sushant Singh Rajput and MS Dhoni (Photo Credits: Twitter)

भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) अलीकडेच आपण इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहोत अशी घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना वाईट वाटले तर काहींनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जगभरातून त्याच्या असंख्य चाहत्यांसह बॉलिवूड, क्रिकेट, राजकारणातील अनेक व्यक्तींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. MS Dhoni Retires

सुशांत सिंह राजपूतने धोनीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला होता. त्यावेळी इंडिया टुडे ने घेतलेल्या मुलाखतीत सुशांतला प्रश्न विचारण्यात आला होता, "धोनीने आता निवृत्ती घ्यावी असे तुम्हाला वाटत नाही का?" त्यावर सुशांतने दिलेले उत्तर खूपच समंजसपणाचे होते. MS Dhoni Retires: अनुष्का शर्मा, रितेश देशमुख यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर दिल्या भावनिक प्रतिक्रीया (View Tweets)

सुशांत म्हणाला, "हा निर्णय धोनीपेक्षा आणखी कोण घेऊ शकतं. जेव्हा तुम्ही अशा एका व्यक्तीबाबत बोलता ज्याने इतक्या काळापर्यंत देशाची सेवा केली, तेव्हा तोच तुम्हाला याचे योग्य उत्तर देईल"

हे सर्वांना माहितच असेल की, सुशांत धोनीकडून खूपच प्रेरित होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो अनेकदा धोनीला भेटत असे. त्यामुळे त्यांची मैत्री देखील खूप घट्ट झाली होती.

सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून धोनीला प्रचंड दु:ख झाले होते आणि मोठा धक्का बसला होता. सर्वात आधी तर त्याला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही की सुशांत आता आपल्यात नाही.