MS Dhoni Retires: अनुष्का शर्मा, रितेश देशमुख यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर दिल्या भावनिक प्रतिक्रीया (View Tweets)
Anushka Sharma, MS Dhoni & Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांनी भावूक होत माहीला धन्यवाद दिले आहेत. बॉलिवूड कलाकारांनी देखील कॅप्टन कूल धोनीला सोशल मीडिया माध्यमातून भावनिक निरोप दिला आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रणदीप हुड्डा (Randeep Hooda), वरुण धवन (Varun Dhawan), विक्की कौशल (Vicky Kaushal), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांसारख्याअनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (महेंद्रसिंह धोनी यानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याची पत्नी साक्षी धोनीने दिली 'अशी' प्रतिक्रिया)

अनुष्का शर्मा आपल्या इंस्टा स्टोरीत एम एस धोनीचा फोटो शेअर करत लिहिले, कधीच न विसरता येणाऱ्या आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद MSD.

Anushka Sharma Insta Story:

Randeep Hooda Tweet:

रणदीप हुड्डाने देखील धोनीचा फोटो शेअर करत नाही... तु नेहमीच बेस्ट राहशील. मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद.

Riteish Deshmukh Tweet:

रितेश देखमुख याने देखील धोनीचा फोटो शेअर करत आमच्या हृदयातून तुझी कधीच रिटायरमेंट होणार नाही असे लिहिले आहे.

2004 मध्ये महेंद्रसिंह धोनी याने आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली. आपल्या दमदार खेळाने त्याने अनेकांची मने जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. 16 वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये महेंद्रसिंह धोनी याने 350 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 10,773 धावा केल्या आहेत.