MS Dhoni and Sakshi Dhoni (Photo Credit: Twitter)

भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने अचानक घेतलेल्या निर्णायाने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनेही (Sakshi Dhoni) आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तिने लाल रंगाचा बदाम आणि हात जोडलेला इमोजी दाखवला आहे.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 पासून मला निवृत्त समजले जावे", असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये दिसणार आहे. 39 वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काहीच वेळात सुरेश रैना यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र, दोघेही आयपीएलच्या स्पर्धा खेळणार असल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- MS Dhoni Retires: महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, हार्दीक पांड्या यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

साक्षी धोनीची प्रतिक्रिया-

धोनी हा आगामी टी-20 विश्वचषकात सहभागी होईल, अशी आशा त्याच्या अनेक चाहत्यांना होती. परंतु, त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. चेन्नईचा संघ 20 ऑगस्टनंतर युएईला रवाना होणार आहे.