Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; बहिण श्वेता सिंह किर्ति ने केली CBI चौकशीची मागणी
Sushant Singh Rajput And Shweta Singh Kirti (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सोमवार आणि मंगळवारी कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवून केस संबंधित सर्व साक्षीदारांना आपला जबाब लेखी स्वरुपात नोंदविण्यास सांगितला होता. आजचा दिवस सुशांतच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि मुख्य CBI मागणीवर (CBI Inquiry) निर्णय दिला दाईल.

आजच्या निर्णयावर ठरेल की, या प्रकरणाचा तपास CBI कडे जाईल की मुंबई पोलिसांकडेच राहील. दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने सोशल मिडियावर CBI चौकशीची मागणी करत एक पोस्ट केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांची खासदार संजय राऊत यांना नोटीस, माफी मागण्यासाठी 48 तासांची मुदत; जाणून घ्या काय म्हणाले Sanjay Raut

या पोस्टमध्ये ती हातात पांढरा बोर्ड घेऊन उभी आहे. ज्यावर तिने लिहिले आहे की, "मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि मी CBI चौकशीची मागणी करत आहे."

श्वेताने या फोटोखाली लिहिले आहे की, 'ही ती वेळ आहे जेव्हा आम्हाला सत्य समोर आणून न्याय मिळवायचा आहे. हे समोर आणण्यासाठी माझी आणि माझ्या परिवाराची मदत करा अन्यथा आम्ही शांतीने जगू शकणार नाही. त्यामुळे सर्वांना CBI चौकशीची मागणी करा.'

सुशांतच्या कुटूंबाने असा आरोप केला आहे की, सुशांतची आत्महत्या नसून तो खून असू शकतो. त्यामुळे ते सर्व CBI चौकशीची मागणी करत आहे.