Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची BSP अध्यक्ष मायावती यांची मागणी
Mayawati & Sushant Singh Rajput (Photo Credits: PTI/Facebook)

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती (Mayawati) यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशांतचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिक चिघळत चालले आहे. त्यामुळे अशावेळी सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे. सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मायावती यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यासाठी मायवती यांनी खास ट्विट केले आहे.

"मूळचा बिहाराचा असलेला तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दर दिवशी नवनवी माहिती समोर येत आहे. सुशांतच्या वडीलांनी पटना पोलिस स्थानकात यासंदर्भात एफआयआर दाखल केल्यानंतर हे प्रकरण अधिकच खोलात जावू लागले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांकडून होण्यापेक्षा या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे," असे मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती विरोधात FIR दाखल झाल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर केली 'ही' पोस्ट, View Post)

Mayawati Tweet:

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "त्याचबरोबर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहता या प्रकरणाचा छडा लावणे हा त्यांचा प्रमुख उद्देश नसून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणे हा आहे. त्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकडे लक्ष दिले जाईल, असे वाटते. जे योग्य नाही." तसंच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार गंभीर व्हा, असेही मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यात त्यांनी रियाने सुशांतच्या पैशाचा गैरवापर करुन त्याला मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.