सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती विरोधात FIR दाखल झाल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर केली 'ही' पोस्ट (View Post)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला होता.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती विरोधात FIR दाखल झाल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर केली 'ही' पोस्ट (View Post)
Sushant Singh Rajput & Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला होता. दरम्यान, मंगळवार, 28 जुलै रोजी सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती  (Rhea Chakraborty) विरोधात पटनामध्ये एफआयआर (FIR) दाखल केली. रिया सुशांतच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचे सांगत त्याला मानसिक त्रास देत असल्याचे सुशांतच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता बिहार पोलिसांनी (Bihar Police) देखील सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती समोरील अडचणी वाढल्या आहेत.

रिया चक्रवर्ती विरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. अंकिताच्या पोस्टमध्ये लिहिले, "Truth Wins." म्हणजे सत्याचा विजय होतो. अंकिताच्या या पोस्टनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. (Sushant Singh Rajput Suicide प्रकरणात मुंबई पोलिस दिशा भरकटवत असल्याचा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांचा आरोप)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते अंकिताला पाठिंबा दर्शवत आहेत. तर तुझ्या भावना समजून शकतो अशा दिलासादायक कमेंट्सही पोस्टखाली पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने त्याच्या कुटुंबियाची भेट घेतली होती.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. काल धर्मा प्रॉडक्शनचे अपूर्व मेहता यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली. तर या आठवडा अखेरीपर्यंत करण जोहरचा जबाब नोंदवण्यात येईल, असे माहिती समोर येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2020 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).