सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे (Photo Credits-Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी दिवसागणिक खुलासा होत आहे. तर ताज्या अपडेट्सनुसार, सुशांत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  हिला NCB कडून अटक करण्यात आली आहे. खरंतर सुशांतच्या प्रकरणात जेव्हा ड्रग्जचा संबंधित काही गोष्ट सुरु उघडकीस आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो यामध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर NCB ने या प्रकरणी तपास करत आहे. रिया हिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांड आणि नोकर दीपेश सावंत यांना सुद्धा एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज रिया हिला चौकशीनंतर एनसीबीने ताब्यात घेतले आहे. रियाला अटक केल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियात ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता लोखंडे हिने एक ट्वीट केले आहे. त्यात अंकिता हिने Justic असे म्हणत एक इमेज सुद्धा शेअर केली आहे. या इमेजमध्ये Nothing happens by change by fate. You Create your own fate by your actions. That's Karma असे लिहिण्यात आले आहे.(Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह व डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या कारण)

यापूर्वी सुद्धा सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने ट्वीट करत असे म्हटले की, देव आपल्या सोबत आहे.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अनुज केसवानी याला 5 दिवसांसाठी एनसीबी कोठडी)

आधीसुद्धा अंकिता हिने सुशांत याला न्याय मिळावा यासाठी मागणी केली होती. तसेच सातत्याने तिने तिचा हा प्रयत्न सुरु असल्याचे ही दिसून येत आहे. ऐवढेच नाही तर ज्यावेळी एनसीबीकडून सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती याला अटक करण्यात आल्यानंतर सुद्धा अंकिता हिने ट्वीट करत 'हर हर महादेव' म्हणत 'सत्याचाच विजय होतो' असे ट्विट केले होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंकिता सुरुवातीपासूनच ट्विटद्वारे आपली प्रतिक्रीया देत आहे. दरम्यान तिने #justiceforsushant ला ही पाठिंबा देण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते.