Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अनुज केसवानी याला 5 दिवसांसाठी एनसीबी कोठडी
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) अमली पदार्थ कनेक्शनचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणी ड्रग पेडलर अनुज केसवानी याला अटक केली होती. अनुज केसवानी (Anuj Keswani) याला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने त्याला 5 दिवसांसाठी एनसीबी कोठडी NCB Custody) सुनावली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

कैझान इब्राहिमची चौकशी करताना अनुज केसवानी याचा सुगावा लागला होता. आतापर्यंत या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय तसेच एनसीबीकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशीमध्ये दररोज नव-नवीन खुलासे होत आहेत. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह व डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या कारण)

दरम्यान, आज रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार व इतरांवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन बनविल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, या सर्वांवर बनावट, एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वे 2020 वर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.