सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) मुख्य आरोपी म्हणून चौकशीला सामोरी जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) आता, सुशांतची बहीण प्रियंका सिंह (Priyanka Singh) आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार व इतरांवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन (Bogus Medical Prescription) बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बनावट, एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वे 2020 वर हा गुन्हा दाखल केला आहे. 14 जून रोजी सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्याचे कुटुंबीय रिया चक्रवर्तीवर विविध प्रकारचे आरोप करीत आहेत. त्याचवेळी रिया चक्रवर्तीदेखील सुशांतच्या कुटूंबावर विविध आरोप करत आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मनेशिंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून, 2020 रोजी सुशांतसिंह राजपूतला Out Patient Department दाखवून, NDPS कायद्यात आयटम 36 आणि 37 अंतर्गत येणारी औषधे लिहून दिली गेली होती. ही औषधे सायकोट्रॉपिक पदार्थांच्या खाली यादीमध्ये ठेवली गेली आहेत आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रतिबंधित यादीमध्ये ती आहेत. या यादीमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या कोणत्याही सायकोट्रॉपिक पदार्थावर आणि अंमली पदार्थांच्या प्रिस्क्रिप्शनवर बंदी आहे. असे करणे टेली मेडिसीन प्रॅक्टिस मार्गदर्शक 3.7.1.4 तत्त्वांचे उल्लंघन आहे.
एएनआय ट्वीट -
#RheaChakraborty files complaint before Mumbai Police requesting that an FIR be registered against Priyanka Singh (Sushant's sister), Dr Tarun Kumar (from RML Hospital, Delhi) and others under IPC, Narcotic Drugs and Psychotropic Substances Act & Telemedicine Practice Guidelines.
— ANI (@ANI) September 7, 2020
सुशांतसिंह राजपूतला त्याची बहीण प्रियंका सिंहने, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमारकडून घेतलेले बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये या औषधांचा उल्लेख होता. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी खोटी बातमी पसरवणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक)
दरम्यान, ईडीच्या तपासादरम्यान काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. त्यानंतर ड्रग्सच्या वापराचा कोनही या प्रकरणात जोडला गेला, त्यानंतर एनसीबीने ईडीच्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल केला. एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंगचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यासह अनेकांना अटक केली आहे.