दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने केलेल्या आत्महत्येनंतर आता कसून चौकशी केली जात आहे. तर दररोज नव्याने खुलासे होत असल्याने सर्वांच्या नजरा आता मुख्य आरोपी कोण असणार किंवा या प्रकरणाचे काय होणार याकडे लागून राहिले आहे. तर नुकत्याच एनसीबीकडून (NCB) तीनहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांचा संबंध ड्रग्जसोबत आल्याने पुराव्यानिशी त्यांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान आता मुंबईतून एका व्यक्तीला सुशांत याच्या मृत्यू प्रकरणी खोट्या बातम्या पसरवण्याचा कारणास्तव अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, आरोपीने युट्यूबरुन काही व्हिडिओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून शहरातील पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलील करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.(Sushant Singh Rajput: अमेरिकेत सुशांत याच्या समर्थकांनी काढली कारची रॅली, बहिणेने शेअर केला व्हिडिओ)
Man arrested in Mumbai for spreading fake news related to case of actor Sushant Singh Rajput's death. Videos uploaded by the accused on YouTube were found to be defamatory and damaging image of city police and Maharashtra government: Police official
— Press Trust of India (@PTI_News) September 6, 2020
दरम्यान, सुशांत याच्या मृत्यूप्रकरणी एनसीबी यांच्याकडून शौविक चक्रवर्ती,सॅम्युअल मिरांडासह कैझद याला अटक करण्यात आली आहे. तर काल एनसीबीने सुशांत याचा नोकर दीपक सावंत याला ताब्यात घेतले असून त्याचा ड्रग्जशी संबंध आल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला आज रिया चक्रवर्ती सुद्धा सकाळी सीबीआयच्या कार्यालयात पोहचल्याचे दिसून आले. त्यानंतर आता सुशांत याची बहिण मितू सिंह सुद्धा डीआरडीओ येथे पोहचली आहे.