Sushant Singh Rajput: अमेरिकेत सुशांत याच्या समर्थकांनी काढली कारची रॅली, बहिणेने शेअर केला व्हिडिओ
सुशांत सिंह राजपूतच्या समर्थकांची रॅली (Photo Credits-Twitter)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या समर्थकांनी त्याची सत्यता आणि न्यायाच्या मागणीसाठी एका कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी अमेरिकेत (US) एक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुशांत याची बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने या रॅलीचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स- ट्वीटर आणि इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिपेश सावंत याला 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी)

व्हिडिओला कॅप्शन देत तिने असे लिहिले आहे की, संयुक्त राज्य अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कार रॅली आहे. आम्ही खरेपणा समोर यावा यासाठी एक वर्ल्ड कॅम्पन राबवत आहोत. हॅशटॅगसत्याग्रहफॉरएसएसआर हॅशटॅगबिलबोर्डफॉरएसएसआर व्हिडिओत कारच्या काचांवर पोस्टर्स चिटकवण्यात आले असून त्यावर हॅशटॅगसत्याग्रहफॉरएसएसआर: अ वर्ल्ड मुव्हमेंट फॉर ट्रुथ असे लिहिण्यात आले आहे.(Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा ला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी)

अन्य एका ट्वीट मध्ये श्वेता हिने असे म्हटले आहे की, प्रार्थना करा की दोषींनी त्यांचा दोष कबुल करावा. आपल्या आत्म्याला पापातून मुक्त करावे. हॅशटॅगग्लोबलप्रेयर्सफॉरएसएसआर असे ही तिने म्हटले आहे.(Sushant Singh Rajput Case: बॉलिवूड मधील ड्रग्जचे गुढ उघकीस आणण्यास शौविक चक्रवर्ती करु शकतो मदत: एनसीबी)

दरम्यान, सुशांत याच्या मृत्यूप्रकरणी एनसीबी यांच्याकडून शौविक चक्रवर्ती,सॅम्युअल मिरांडासह कैझद याला अटक करण्यात आली आहे. तर काल एनसीबीने सुशांत याचा नोकर दीपक सावंत याला ताब्यात घेतले असून त्याचा ड्रग्जशी संबंध आल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला आज रिया चक्रवर्ती सुद्धा सकाळी सीबीआयच्या कार्यालयात पोहचल्याचे दिसून आले. त्यानंतर आता सुशांत याची बहिण मितू सिंह सुद्धा डीआरडीओ येथे पोहचली आहे.