Sushant Singh Rajput Case: बॉलिवूड मधील ड्रग्जचे गुढ उघकीस आणण्यास शौविक चक्रवर्ती करु शकतो मदत: एनसीबी
शौविक चक्रवर्ती (Photo Credits: योगेन शाह, विकिपीडिया)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर ड्रग्स संबंधित प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) यांनी असा दावा केला आहे की, मुख्य आरोपी शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) याने अशा काही नावांचा खुलासा केला असून जेणेकरुन आता बॉलिवूड आणि मुंबईतील ड्रग्जचे गुढ उकलण्यासह ते संपवण्यापर्यंत मदत करु शकतो. एनसीबीने शनिवारी रिमांड याचिकेत ही गोष्ट स्पष्ट केली आहे. सुशांत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या संभाव्य अटकेकडे इशारा करत एनसीबीने रिमांड याचिका दाखल केली होती. यामध्ये एनसीबीने चौकशीसाठी शौविक याला पाच दिवसांसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली होती. तसेच त्याची बहिण रिया आणि अन्य एक व्यक्ती दीपेश सावंत यांच्या समोर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

शौविक याला 4 सप्टेंबला अटक केली होती. आता एनसीबी त्याची काही प्रकरणांसह आर्थिक गोष्टींसंदर्भात चौकशी करणार आहेत. सीडीआर रेकॉर्ड्सच्या आधारावक, व्हॉट्सअॅप चॅट आणि अंमली पदार्थांची तस्करीच्या प्राथमिक चौकशी संदर्भात एनसीबीने असे म्हटले आहे की, काही लोकांचा शोध लावायचा आहे. त्याचसोबत जे अद्याप फरार आहेत त्यांचे सत्य सुद्धा समोर आणून अटक करायची आहे. मुंबईत अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाअंतर्गत रिमांड याचिकेत एनसीबीने असे म्हटले आहे की, शौविक ड्र्ग्ज डिलिव्हरी करणाऱ्यांची मदत करत होता. ड्रग्जची किंमत आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमाधून केली जाणारी डिलिव्हरी आणि त्यासाठी पेमेंट गेटवे प्रमाणे काम करत होता. जे सार्वजनिक सुरक्षा आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे.(Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना NCB कोठडी सुनावल्यानंतर अंकिता लोखंडे ने दिली अशी प्रतिक्रीया View Tweet)

त्याचसोबत सह आरोपी सॅम्यु्अल मिरांडा याला सुद्धा 9 सप्टेंबर पर्यंत एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एनसीबीचे उप निर्देशक एम. ए. जैन यांनी मीडियातील लोकांशी बातचीत करताना असे म्हटले आहे की, एका संभावित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा इशारा मिळत आहे. या प्रकरणी शौविकची भागीदारी 28 ऑगस्टला एनसीबी मुंबई आणि दिल्लीच्यी टीमद्वारे अब्बास आर, लखानी यांच्यासह कर्ण वी, आरोरा याला जुना कुर्ला आणि चांदीवली, पवई येथून ड्रग्ज हस्तगत केल्यानंतर समोर आली होती. त्यांनी जॅड विलाताराच्या भागीदारीचा सुद्धा खुलासा केला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात विदेशी नोटा जप्त केल्या आहेत. विलाताराला 2 सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला 7 दिवसांसाठी कोठडीत पाठवले आहे. त्याने चौकशीवेळी दरम्यान खरीदार अब्देल बासित परिहारच्या नावाचा खुलासा केला. परिहारने असे म्हटले की, शौविक याच्या सांगण्यावरुन या लोकांकडून ड्रग्ज खरेदी केले जात होते. अशा पद्धतीने प्रकरण उघडकीस आल्यानंतर शौविक याला अटक करण्यात आली.