Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना NCB कोठडी सुनावल्यानंतर अंकिता लोखंडे ने दिली अशी प्रतिक्रीया (View Tweet)
Ankita Lokhande, Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram/Facebook)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी सध्या मुंबईत सीबीआय (CBI) तपास सुरु आहे. ड्रग्स तस्करीच्या अनुषंगाने तपास सुरु असून रिया चक्रव्रतीचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांना 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनवण्यात आली आहे. यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने 'हर हर महादेव' म्हणत 'सत्याचाच विजय होतो' असे ट्विट केले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंकिता सुरुवातीपासूनच ट्विटद्वारे आपली प्रतिक्रीया देत आहे. दरम्यान तिने #justiceforsushant ला ही पाठिंबा देण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं होतं.

'हर हर महादेव' असं लिहित ओम लिहिलेला फोटो अंकिता लोखंडे हिने ट्विट केला आहे. सोबत #satyamevjayte #truthwins #justiceforsushant हे हॅशटॅग जोडले आहेत. (Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा ला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी)

Ankita lokhande Tweet:

काल शोविक चक्रवर्तीआणि सॅम्युअल मिरांडा यांना NCB ने ताब्यात घेतल्यानंतर सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने देखील देवाचे आभार मानले होते. त्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये श्वेता यांनी लिहिले की, "NCB चांगलं काम सुरु आहे. धन्यवाद देवा..."

Shweta Singh Kirti Tweet:

दरम्यान काल NCB (Narcotics Control Bureau) च्या टीमने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांच्या घरी छापे टाकले. त्यानंतर काल रात्री त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर आज या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.