Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा ला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी
Showik, Rhea Chakraborty (Photo Credits: File Image)

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रव्रतीचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) ला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने (Esplanade Court) 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी (NCB) कोठडी सुनावली आहे. एनसीबीने शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 7 दिवसांची कोठडी मागितली होती. तसेच कैझन इब्राहिमला न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यानुसार, इब्राहिमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी एनसीबीने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर एनसीबीने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास या दोघांना अटक करण्यात आली होती. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. (हेही वाचा - Nitesh Rane On Kangana Ranaut: बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे, कंगना तो एक बहाना है - नितेश राणे)

यावेळी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा, आणि जैद आणि कैझेन इब्राहिम यांना न्यायलयात हजर करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.