Nitesh Rane On Kangana Ranaut: बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे, कंगना तो एक बहाना है - नितेश राणे
Nitesh Rane, Kangana Ranaut (PC - Facebook)

Nitesh Rane On Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यादरम्यान झालेल्या वादात मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली. त्यामुळे कंगनावर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून टीका करण्यात आली. अशातचं भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी कंगनासंदर्भात एक सूचक ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, 'कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचं. बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे. बाकी काही नाही.' (हेही वाचा - Actors On Kangana Ranaut: मुंबईची पाकव्याक्त काश्मीरची तुलना करणाऱ्या कंगना रनौत हिला उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे यांचे सणसणीत उत्तर; पहा काय म्हणाल्या (View Tweets))

कंगनाच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली. याशिवाय भाजप नेत्यांनीदेखील कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर कंगनाने अनेकदा भाष्य केलं होतं. त्यानंतर कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार देत आपल्याला मुंबई पोलिसांचीचं जास्त भीती वाटत असल्याचं तिने म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून कंगनाच्या ट्विटवरून सोशल मीडियावर शीत युद्ध चालू आहे.