Urmila Matondkar & Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंबई (Mumbai) शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कलाकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी कंगनाच्या या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी देखील कंगनावर निशाणा साधला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कंगना हिला ट्विटद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. कृतघ्न व्यक्तीचे असे बोलू शकते, असंही उर्मिलाने म्हटलं आहे.

उर्मिला हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "महाराष्ट्र हा देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. महान छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे.. मुंबईने लाखो भारतीयांचे पालन पोषण केले आहे आणि त्यांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ कृतघ्न लोकच मुंबईची पीओके सोबत तुलना करु शकतात. हे सगळं अत्यंत स्तब्ध आणि हैराण करणारं आहे." (Kangana Ranaut च्या मुंबईला PoK सोबत तुलना करण्याच्या वक्तव्यानंतर Mumbai Police च्या 'उमंग' कार्यक्रमातील तिचाच 'मुंबई तुलनात्मक सुरक्षित' चा जुना व्हिडिओ व्हायरल)

Urmila Matondkar Tweet:

अभिनेत्री रेणूका शहाणे हिने देखील कंगना रनौत हिच्या या व्यक्तव्यावर तिला फटकारलं आहे. मुंबई हे शहर आहे जिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची केलेली तुलना भयानक आहे. चलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं ट्विट रेणूका शहाणे यांनी केलं आहे.

दरम्यान कंगना हिने रेणूका शहाणे यांच्या ट्विटवर उत्तर देताना म्हटलं की, प्रिय रेणुकाजी, सरकारी धोरणांवर टीका करणं हे एखाद्या जागेचं कौतुक न करण्यासारखं कधीपासून झालं. तुम्ही इतक्या भोळ्या तर नक्कीच नाही. ती तुम्हीही इतर गिधडांप्रमाणे माझे लचके तोड्याची वाट पाहत होता?, तुमच्याकडून अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे.”

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील अनेक वादग्रस्त मुद्दे स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचे कंगना म्हणाली. यासंदर्भात केले्लया ट्विटमध्ये कंगना हिने म्हटले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पुन्हा परतू नको, अशी मला धमकी दिली आहे. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” कंगनाच्या या व्यक्तव्यावर बॉलिवूड कलाकार, मराठी कलाकार, राजकीय नेते ते अगदी सर्वसामान्य यांनी कंगना हिला सडेतोड उत्तर दिले आहे.