Kangana Ranaut च्या मुंबईला  PoK सोबत तुलना करण्याच्या वक्तव्यानंतर  Mumbai Police च्या 'उमंग' कार्यक्रमातील तिचाच 'मुंबई तुलनात्मक सुरक्षित' चा जुना व्हिडिओ व्हायरल
Kangana Ranaut (Photo Credits: YouTube)

बॉलिवूडमधील मुव्ही माफियांपेक्षा सध्या मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया देत मुंबईमध्ये न परतण्याची भीती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली असून मला मुंबई पाकव्याप्त कश्मीर असल्यासारखं का वाटत आहे? अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  हीने ट्वीटरच्या माध्यमातून दिल्यानंतर अनेक मुंबईकारांनी तिला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी रितेश देशमुख, सोनू सूद, स्वरा भास्कर यांच्या मराठी कलाकार, पत्रकारांनी देखील कंगनावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान इंटरनेटवर नेटकर्‍यांनी कंगनाचा पोलिसांचा वार्षिक कार्यक्रम उमंग (Umang)  मधील एक जुना व्हिडीओ शोधून काढला आहे. 2017 सालचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी कंगनाला तिनेच काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांबद्दलचे आणि सुरक्षित मुंबई बद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करणारा जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे. Sonu Sood On Kangana Ranaut: 'मुंबई... हे शहर नशीब बदलते, सलाम कराल तर सलामी मिळेल' अभिनेता सोनू सूद याचा कंगणा रनौत हिला टोला.  

दरम्यान व्हिडिओ मध्ये कंगना मुंबई इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित असल्याचं सांगताना दिसत आहे. पूर्ण सुरक्षित नाही मात्र देशात इतर गावांमध्ये यापेक्षा वाईट परिस्थिती आहे अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली होती.

कंगनाची पहा प्रतिक्रिया

कंगनाच्या व्हिडिओ लक्ष वेधणारे ट्वीट्स 

 

दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मला मुंबईमध्ये परत येऊ नकोस अशी खुली धमकी दिल्याचा दावा केला आहे. तसेच मला केंद्र सरकार किंवा हिमाचल सरकारने प्रोटेक्शन द्यावं मुंबई पोलिसांची मला भीती वाटते अशी देखील प्रतिक्रिया तिने दिली आहे. मात्र संजय राऊतांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्यामते ट्वीटरवर गप्पा मारण्यात अर्थ नाही. ड्रग्ज माफियांबद्दल काही पुरावे असतील तर पोलिसांना द्यावेत.