सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, कंगना रनौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता बॉलिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनच्या काळात स्थालंतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद (Sonu Sood) यानेही उडी घेतली आहे. सोनू सूदने कंगना रनौतला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई... हे शहर नशीब बदलते, सलाम कराल तर सलामी मिळेल' अशा शब्दात त्याने ट्विट केले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सतत मत मांडणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. त्यानंतर कंगना रनौतने एक ट्विट केले आहे. ज्यात असे म्हटले आहे की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असे कंगना म्हणाली आहे. हे देखील वाचा- Kangana Ranaut Wants A Drug Test: रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल यांना कोकिनचे व्यसन? अफवांना पूर्णविराम देण्यासाठी कंगना रनौतची सर्वांना ड्रग्ज टेस्ट करण्याची विनंती
सोनू सूद याचे ट्विट-
मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है।
सलाम करोगे तो सलामी मिलेगी। 🇮🇳
— sonu sood (@SonuSood) September 3, 2020
कंगनाच्या वक्तव्यानंतर मराठी कलाकरांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुख केदार शिंदे, स्वप्नील जोशी, स्वरा भास्कर यांनी कंगनाच्या ट्विटला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.