Mahesh Babu & Swara Bhaskar (Photo Credit - Instagram)

कोरोनाची तिसरी लाट जवळपास येऊन ठेपली आहे, ज्या वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लाॅकडाउण (Lockdown) लागण्याची शक्यात आहे. बॉलिवूड (Bollywood Celebrity) सेलिब्रिटी आपल्या चित्रीकरणासाठी त्यांना बाहेर पडाव लागत पण तिथेही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. गेल्या एका आठवड्यात बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींना कोरोनाची (Coronavirus in Bollywood) लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार साऊथ सुपरस्टार अभिनेता 'महेश बाबु' (Mahesh Babu) आणि अभिनेत्री 'स्वरा भास्कर' (Swara Bhaskar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वराने सांगितले जेव्हा तिची चाचणी झाली तेव्हा तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचवेळी तिचे कुटुंब या कोरोनाच्या विळख्यात आले आहे. तसेच दोघांनी सर्व चाहत्यानां सुरक्षित राहण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहनही केले आहे.

महेश बाबु यांची सोशल मीडिया पोस्ट

साऊथ चित्रपटांचे सुपरस्टार महेश बाबू यांनी स्वत:ची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांनी स्वतःला घरी आयसोलेशन करुन घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

 

महेश बाबूने पुढे लिहिले की, 'माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी चाचणी करून घेण्याचे आवाहन करतो. जे लस घेत नाहीत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे जेणेकरून त्यांना रुग्णालयात जाण्याचा धोका कमी होईल. शेवटी त्यांनी लिहिले- 'कृपया कोविडच्या नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.' (हे ही वाचा Amitabh Bachchan यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची BMC ची माहिती)

स्वराने ट्विटर अकाऊंटवरून माहिती शेअर केली

तिच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देताना स्वराने लिहिले की, मला नुकताच माझा आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाला आहे आणि मी कोविड पॉझिटिव्ह आहे. क्वारंटाईनमध्ये स्वतःला वेगळे केले. ताप, डोकेदुखी, चव कमी होणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत.

मी दुहेरी लस घेतली आहे, त्यामुळे लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. कुटुंबाबद्दल आभारी आहे आणि मी घरी आहे. तुम्ही पण सुरक्षित रहा. स्वराने इन्स्टाग्राम स्टोरीचे आवाहनही ट्विटरवर शेअर केले आहे.

यापूर्वी, जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, अलाया एफ, अर्जुन कपूर, नोरा फतेही आणि एकता कपूर यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.