Suhana Khan (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने जगभरात आपले नाव कमवले आहे. शाहरुखने आपल्या फिल्मच्या करियरमध्ये एकाहून एक दमदार सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. त्याचसोबत त्याच्या प्रत्येक सिनेमांसाठी चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद दिला जातो. अशातच आता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिच्या बद्दल सुद्धा नेहमीच चर्चा सुरु आहेत. त्याचसोबत सुहाना ही सोशल मीडियात सुद्धा अधिक अॅक्टिव्ह असून नुकतेच तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सुहाना हिने ट्रान्सपरेंट टॉप घातल्याचे दिसून येत आहे.

सुहाना खान हिने आपल्या इंस्ट्राग्राम स्टोरीवर ट्रान्सपेरेंट टॉप घातल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच ती उन्हामध्ये उभी असून अत्यंत खास पोज देत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान तिने व्हाइट रंगाचा ट्रान्सपेरेंट टॉप आणि ब्लू रंगाची हाफ पॅंन्ट घातली आहे.(शाहरुख खान ची मुलगी Suhana Khan हिने रंगावरुन थट्टा करण्याऱ्यांना सोशल मीडियात पोस्ट करत दिले 'हे' सडेतोड उत्तर)

Suhana Khan (Photo Credits-Instagram)

अलिकडेच सुहाना खान हिने आपले इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. त्यानंतर तिच्या फॉलोव्हर्सची संख्या झपाट्याने वाढली. इतकंच नाही तर तिच्या नावाने  सोशल मीडियावर अनेक फॅन क्लब अॅक्टीव्ह आहेत. सुहानाच्या  बॉलिवूड पर्दापणाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' मधून तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.