शाहरुख खान ची मुलगी Suhana Khan हिने रंगावरुन थट्टा करण्याऱ्यांना सोशल मीडियात पोस्ट करत दिले 'हे' सडेतोड उत्तर
बॉलिवूड मधील किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिला सध्या सोशल मीडियात तिच्या त्वचेच्या रंगावरुन (Skin Tone) ट्रोल करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा तिला विविध कारणांमुळे अशाच पद्धतीने ट्रोल केल्याचे दिसून आले होते.
बॉलिवूड मधील किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिला सध्या सोशल मीडियात तिच्या त्वचेच्या रंगावरुन (Skin Tone) ट्रोल करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा तिला विविध कारणांमुळे अशाच पद्धतीने ट्रोल केल्याचे दिसून आले होते. पण आता मात्र आपल्या रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोर उत्तर दिले आहे. सुहाना हिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात सुहाना हिने प्रत्येक ट्रोलर्सला तिच्या शब्दांनी उत्तर दिले आहे.(सुहाना खान हिचे मित्रांसोबतच्या पार्टीतील कूल लूकचे फोटो सोशल मीडियात व्हायरल Photos)
सुहाना हिने पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, काही काळापासून असे सुरु आहे की जे ठीक करणे आता गरजेचे आहे. हे फक्त माझ्याबद्दलच नाही आहे. हे त्या सर्व मुली आणि मुलांबद्दल आहे जे कोणत्याही हिन भावननेने ग्रस्त होऊन ही वाढले आहेत. माझ्या कपड्यांवरुन किंवा राहणीमानावरुन विविध कमेंट्स करण्यात आल्या आहेत. ऐवढेच नाही तर त्वचेच्या रंगावरुन मला हिणवण्यात आले आहे. आपण सर्वजण भारतीय असून आपल्या त्वचेचा रंग तसाच आहे. आपण विविध रंगात येतो पण यामुळे काहीच फरक पडत नाही. पोस्टच्या शेवटी सुहाना हिने तिला स्किन टोनवरुन ट्रोल करण्यात आल्याने #endcolourism असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.(शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान हिचा सेल्फी सोशल मीडियावर होत आहे Viral; See Photo)
सुहानाने असे ही म्हटले आहे की, आपल्याच लोकांचा तिरस्कार करणे म्हणजे तुम्ही दु:खांपासून सुरक्षित नाही आहात. मी सांगू इच्छिते की, मी 5.3 इंचाची असून त्वचेचा रंग ब्राउन आहे. त्यामुळे मी जशी आहे तशी आनंदी आहे. तसेच तुम्ही सुद्धा खुश असलात पाहिजे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2020 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

