शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान हिचा सेल्फी सोशल मीडियावर होत आहे Viral; See Photo
Suhana Khan (Photo Credits: Instagram)

Suhana Khan's Photo Gets Viral: शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी अ‍ॅक्टिव असते. सुहाना वेळोवेळी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि म्हणूनच चित्रपटांपासून ती खूप दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सुहाना खानचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या सुहाना खानच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो तिच्या फॅन क्लबने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सुहाना खानच्या या फोटोवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या असून त्यांचा अभिप्रायही दिला ​​आहे.

या फोटोमध्ये सुहाना खान मजेशीर स्टाईलमध्ये वेगवेगळे हावभाव देत सेल्फी घेताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

Double tap ❣️ @suhanakhanteam

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

सुहाना खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. तिची अनोखी स्टाईल असो किंवा तिचा हटके अंदाज, ती नेहमीच सोशल मीडियावर लोकप्रिय असते. इतर स्टार किड्स प्रमाणेच तिलाही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याची इच्छा आहे, पण तिचे वडील शाहरुख खान यांचे म्हणणे आहे की शिक्षण संपल्यानंतरच ती अभिनयाच्या जगात प्रवेश करेल.

कपिल शर्मा ने त्याच्या बेबी गर्ल 'अनायरा शर्मा' ची पहिली झलक शेअर केली सोशल मीडियावर (Photos Inside)

दरम्यान, शाहरुख खानची मुलगी सुहाना सध्या न्यूयॉर्क विद्यापीठातून शिकत आहे. ती अलीकडेच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात आली होती. परंतु, आता मात्र ती परत न्यूयॉर्कमध्ये अभ्यासासाठी गेली आहे.