Kapil Sharma with daughter Anayra Sharma (Photo Credits: Twitter)

Kapil Sharma Shares Photos Of His Baby Girl: कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी त्यांच्या कुटुंबात डिसेंबर 2019 मध्ये एका बेबी गर्लचे स्वागत केले. तेव्हापासूनच कपिलचे चाहते त्याच्या मुलीच्या फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या जोडप्याने डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले आणि बरोबर एक वर्षाने त्यांनी एक मुलीला जन्म दिला. कपिलने आपल्या मुलीच्या नाव काय ठेवले आहे हे जाणून घेण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक होते. अखेर, कपिलने आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या मुलीच्या नावाची घोषणा करत तिची ओळख देखील करुन दिली. अनयरा शर्मा असे तिचे नाव आहे.

"आमच्या हृदयाच्या तुकड्याला भेट द्या" अनायरा शर्मा # कृतज्ञता ", असे लिहीत कपिलने आपल्या चाहत्यांसह त्याच्या मुलीचे काही काही फोटो शेअर केले आहेत. अनायरा तिच्या पहिल्या फोटोमध्ये खूपच गोड दिसते. यापुढे ती आपल्या गोंडस फोटोंनी संपूर्ण इंटरनेटवर राज्य करणार हे मात्र नक्की. यापूर्वी कपिलच्या फॅन क्लबने तिचा फोटो शेअर केला होता आणि तो इंटरनेटवर व्हायरल देखील झाला.

 नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside

अनायरासोबत या जोडप्याने त्यांच्या लग्नाची ऍनिव्हर्सरी खूपच उत्साहात साजरी केली होती. तिच्या उपस्थितीने निश्चितच त्यांचा हा खास दिवस अधिक स्पेशल बनला. दरम्यान कपिलचा, द कपिल शर्मा शो हा सध्या खूपच हिट ठरत असून टीआरपी रेटिंगमध्ये देखील तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे कपिलचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही.