नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside
Neha Kakkar, Aditya Narayan (Photo Credits: Instagram)

Neha Kakkar And Aditya Narayan Marriage: नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या चर्चा काहीकाळापासून पाहायला मिळत आहेत. होय, आदित्य आणि नेहा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. हे सर्व घडले आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इंडियन आयडल 11 च्या एपिसोडमध्ये. या शोमध्ये नेहा जजच्या भूमिकेत दिसते तर आदित्य या शोचे होस्टिंग करतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या भागात आदित्यचे वडील उदित नारायण हे अलका याग्निक यांचोसबत या शोमध्ये पाहुणे म्हणून भेट दिली. त्याचसोबतआदित्यची आई आणि नेहाचे आई-वडीलही विशेष उद्देशाने शोमध्ये उपस्थित होते. दोघांच्याही कुटुंबीयांनी शोमध्ये या दोघांचं लग्न ठरवण्यासाठी हजेरी लावली होती.

नेहा आपल्या आई-वडिलांना या शोमध्ये पाहून भारावून गेली होती, तर आदित्य मात्र आनंदात नाचणे थांबवू शकला नाही. नेहाचे आई-वडील आणि आदित्यचे पालक यांनी एकमेकांना मिठी मारली. नेहाने जेव्हा चिंतीत होऊन आईला विचारले, 'काय चाललंय?' त्यावर तिच्या आईने तिला उत्तर दिले, 'आम्ही ठरवलं आहे की तुझं लग्न आदित्यशी होणार आहे. तुझे वडिलांना आणि मला हा मुलगा तुझ्यासाठी पसंत आहे आणि आम्ही तुमच्या लग्नाची वाट बघत आहोत.'

अखेर दीपिका पादुकोण च्या जेएनयू भेटीवर बोलल्या छपाक चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार

आता मात्र या दोघांच्या लग्नाची तारीख देखील ठरवण्यात आली आहे. नेहा आणि आदित्य 14 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्नबंधनात अडकणार आहेत. आणि ही घोषणा त्यांच्या पालकांनी शोच्या सेटवरच केली होती. कार्यक्रमातील जज विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया यांच्यासह शोमधील सर्वजण या घोषणेनंतर आनंदात होते. लग्नाची तारीख निश्चित झाली असल्याने हिमेशने विचारले, 'मेहंदीची तारीख 1 फेब्रुवारीला का ठेवली नाही?' त्यामुळे या नव्या कपलच्या लग्नाची आणि मेहंदीची तारीख निश्चित झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.