सुहाना खान हिचे मित्रांसोबतच्या पार्टीतील कूल लूकचे फोटो सोशल मीडियात व्हायरल (Photos)
सुहाना खान (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूड मधील अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना (Suhana Khan) हिच्याबद्दल सोशल मीडियात चर्चा अधिकाधिक रंगत आहेत. तसेच सुहाना हिच्या लूकवरुन तिच्या चाहत्यांना ती नेहमीच भुरळ पाडत असते. तर नुकताच इन्स्टाग्रामवर सुहाना हिचे मित्रांसोबत पार्टीकरत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुहाना कूल लूकमध्ये दिसून येत आहे.

सुहाना हिने इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या फोटोत ती काही मित्रमैत्रीणींसोबत पार्टी करताना दिसत आहे. तसेच फोटोत काही मुले अंगावर शर्टलेस दिसून येत आहे. सुहानाच्या या पार्टीमधील फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र लवकरच सुहाना बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.(सुहाना खान हिचा पार्टीतील जोशात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी ड्रेसवरुन उडवली खिल्ली Video)

 

View this post on Instagram

 

Babe with buddies ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

तर काही दिवसांपूर्वी सुद्धा सुहाना हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी मोकळेपणाने सुहाना डान्स करताना दिसून आली. त्याचसोबत तिने घातलेल्या कपड्यांवरुन काही नेटकऱ्यांनी संतापसुद्धा व्यक्त केला होता.