Sonam Kapoor Blessed with a Baby Boy: अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर शनिवारी ही अभिनेत्री आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. नीतू कपूर (Neetu Kapoor) ने सोनम कपूरच्या प्रसूतीची आनंदाची बातमी सांगितली आहे. तिने सोनम आणि आनंदने जारी केलेल्या नोटची पोस्ट शेअर करून त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय नीतू कपूर ने सुनिता आणि अनिल कपूरचे (Anil Kapoor) आजी-आजोबा झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.
या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, '20.08.2022 रोजी आम्ही आमच्या सुंदर बाळाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला साथ देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे. परंतु, आम्हाला माहित आहे की, आता आमचे जीवन कायमचं बदलणार आहे. - सोनम आणि आनंद." (हेही वाचा - Jogi Teaser Out: Diljit Dosanjh चा आगामी थ्रिलर चित्रपट 'जोगी'चा टीझर रिलीज, Watch Video)
या संदेशात सोनम आणि आनंद यांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी एका सुंदर मुलाला जन्म दिला असून ते खूप आनंदी आहेत आणि देवाचे आभारी आहेत, असं म्हटलं आहे. सोनमने सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आभार मानले आहेत.