Shiv Jayanti 2020 | (Photo Credits: Facebook Picabay)

आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस. आज शिवरायांची 390 वी जयंती.  शिवरायांच्या जन्मदिवसादेचा उत्साह राज्यासह देशा-परदेशातही पाहायला मिळत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या पराक्रमी, शौर्यवान, कीर्तिवान राजाला विविध स्तरातून मानवंदना दिली जात आहे. नेते, खेळाडू, कलाकरांनीही शिवजयंतीचं औचित्य साधत शिवरायांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार अजय देवगन यांच्या सह अनेक कलाकारांनी शिवरायांच्या जन्मदिनी खास ट्विट करत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

शिवाजी महाराजांनी पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता याच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यातील अनेक गुणांनी त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले. शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे हे खास पोवाडे (Watch Video)

अमिताभ बच्चन यांचे ट्विट:

अजय देवगन याचे ट्विट:

शाळेत असल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज मला आदर्श वाटतात. तानाजी सिनेमाच्या निर्मिती दरम्यान मला त्यांचे शौर्य आणि भावना पुन्हा जाणता आल्या. शिवजयंती निमित्त भारताच्या शूर पुत्राला माझा सलाम.

राज बब्बर ट्विट:

 

शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. आपल्या पराक्रमांनी आणि कर्तृत्वाने शिवरायांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जावू लागले. 1870 साली पुण्यात जोतीराव फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. त्यानंतर त्याला व्याप्त स्वरुप प्राप्त झाले आणि आता शिवजयंती हा महारष्ट्रासाठी एक सणच झाला आहे.