Shivaji Maharaj Powada: शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे हे खास पोवाडे (Watch Video)
Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

Shivaji Maharaj Jayanti 2020 Powada:  छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता सर्वश्रुत आहे. पण लोककलावंतांनी विशेष शब्दरचना करुन त्याला चाल लावून महाराजांवर पोवाडे रचले आणि त्यांची ख्याती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांच्या जन्मावर, त्यांच्या विशेष पराक्रमांवर, त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांवर पोवाडे रचले गेले. या पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आजही जिवंत भासतात. खरंतर शिवरायांचे विचार, त्यांची महती पुढच्या पिढीपर्यंत लिलया पोहचवण्यचे कार्य हे पोवाडे करतात. (Shiv Jayanti 2020 Wishes: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणार्‍या Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करुन साजरा करा यंदाचा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव!)

19 फेब्रुवारी म्हणजेच उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती आहे. या निमित्त ऐकूया काही खास महाराजांच्या  पराक्राला, शौर्याला उजाळा देणारे काही पोवाडे. (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा शिवरायांचे हे सकारात्मक विचार!)

'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या सिनेमातील नंदेश उपम यांच्या भारदस्त आवाजातील शिवरायांची कीर्ती सांगणारा खास पोवाडा.

शाहीर पिलाजीराव सरनाईक यांच्या आवाजातील शिवशाहीचा इतिहास यात सांगितला आहे.

'शिवरायांची सून ताराराणी' सिनेमातील खास पोवाडा.

कोंढाणा किल्ला जिंकल्याची महती सांगणारा 'बाळकडू' सिनेमातील उमेश कामत याचा हा खास पोवाडा.

'बघतोस काय मुजरा कर' सिनेमातील सिद्धार्थ महादेवन याच्या आवाजातील शिवाजी महाराजांचा खास पोवाडा.

पोवाडा म्हटलं की आपल्याला शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेषत: आठवतात. स्फूर्ती देणारा हा गीत प्रकार असून यात अनेक वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, सामर्थ्याचे, गुणांचे कौतुक केले जाते.