अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने मराठमोळ्या अंदाजात दिल्या आपल्या चाहत्यांना मकरसंक्रांती च्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही भारतीय सणांना नेहमी महत्व देते. मग तो सण गणेश चतुर्थी असो वा दिवाळी. ती आपल्या कुटूंब आणि मित्र मंडळीसह आनंदात साजरे करते. तसेच सोशल मिडियावर तिचे अनेक योगा व्हिडिओ, वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर करते. नुकताच तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्य ती मकर संक्रांतीच्या आणि पोंगलच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहे, हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओचे वैशिष्ट्य तिने मराठमोळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने धुडकावली 10 कोटींची जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून (Nikamma Movie) बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. शिल्पाने 2007 मध्ये 'अपने' या चित्रपटात काम केले होते. शिल्पाने बॉलिवूडमधून विश्रांती घेतली होती. मात्र, तरी ती छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमात सहभागी होती. शिल्पाने फिटनेसचे महत्त्व लक्षात घेऊन आपले स्वत: चे योगा अॅप सुरू केले. निकम्मा चित्रपटातील शिल्पाची भूमिका पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

शिल्पा शेट्टी स्वत:ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे. शिल्पाची मुख्य भूमिका असणारा 'निकम्मा' हा चित्रपट 5 जून 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.