बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने धुडकावली 10 कोटींची जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

फिटनेसच्या बाबतीत नेहमीच आग्रही असलेली आणि आणि योग साधनेला विशेष महत्व देणारी बॉलिवूडची हॉट आणि स्लिम अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) फिटनेसबाबतीत जनजागृती करायची असेल नेहमीच सक्रियरित्या पुढाकार घेते. या अभिनेत्रीचे फिटनेसचे वेड हे अख्ख्या जगाला माहित आहे. त्यातच एक पाऊल पुढे टाकत आपल्याकडून तरुण पिढीला किंवा आपल्या चाहत्यांना चुकीची संदेश जाऊ नये म्हणून शिल्पा ने चक्क 10 कोटींची जाहिरात नाकारली आहे. आजतकने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही शिल्पाला एका जाहिरात कंपनीने स्लिमिंग पिलच्या गोळ्यांची जाहिरात ऑफर केली होती.

शिल्पाचे म्हणणे आहे की, ज्या गोष्टींवर तिचा विश्वास नाही, ती गोष्ट ती कधीच करणार नाही. त्यामुळे जाहिरात कंपनीने सांगितलेल्या गोळ्या कोणतेही डाएट न करता वजन कमी करण्याचे आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात काही होत नसून ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते, असं आज तक च्या रिपोर्टनुसार म्हणणे आहे.

44 वर्षीय शिल्पा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये शिल्पाने आपल्या कमबॅकचे संकेत दिलेत. हिंदी चित्रपटांशी माझे नाते संपलेले नाही. ते आजही कायम आहे. सध्या माझ्याकडे कमीत कमी पाच स्क्रिप्ट आहेत. ज्या मी वाचतेय. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पाचपैकी जी स्क्रिप्ट मला आवडेल, त्या चित्रपटातून मी कमबॅक करेल, असे शिल्पाने सांगितले.

हेही वाचा- व्हिडिओ: मर्लिन मुनरो करण्याच्या नादात फसली आणि स्वत:वरच हसली शिल्पा शेट्टी; काय घडलं स्वत:च पाहा

सध्या शिल्पा 'सुपर डान्सर 3' च्या डान्स रिअॅलिटी शो ची परीक्षक आहे. हा शो संपताच शिल्पा आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिल्पाने 1993 मध्ये शाहरुख खान सोबत 'बाजीगर' या चित्रपटातून पदार्पण केले होते.