
Shama Sikander Bold Photos: सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोजने धुमाकूळ घालणारी अभिनेत्री शमा सिकंदर हिच्या फोटोजची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता असते. शमा सिकंदर हिच्या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. फोटोमधील तिचा हॉटनेस चाहत्यांना नक्कीच घायाळ करतो. त्यामुळे अल्पावधीतच तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. शमा सिकंदर हिचा नवाकोरा बोल्ड फोटो समोर आला आहे. यात शमाने ब्लॅक रंगाचा सेक्सी ड्रेस घातला असून खिडकीजवळ उभी राहून तिने पोज दिली आहे. तिचे स्टायलिश बुट्स तिच्या हॉटनेसमध्ये भर टाकत आहेत. हा फोटो शमाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ''Be yourself. Everyone else is taken....'' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
शमा सिकंदरचे 17 लाख फॉलोव्हर्स असून तिचे बोल्ड फोटोशूट आणि हॉट व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी शमा नवेनवे फोटोज शेअर करत असते. (ओलसर खडक आणि बिकिनीतील शमा सिकंदर, सौंदर्याचा नजराणा पाहिलात का?)
पहा शमा सिकंदर हिचा बोल्ड फोटो:
'मेरी लाइफ है,' 'सीआयडी,' 'काजल,' 'मन में है विश्वास,' 'बाल वीर' यांसारख्या टीव्ही शो मध्ये शमाने काम केले आहे. तर विक्रम भट्ट यांच्या 'माया' या वेबसिरीजमधील शमाची भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. यात तिने अत्यंत बोल्ड भूमिका साकारली होती. याशिवाय 'सेक्सोहोलिक' या शॉर्ट फिल्ममध्ये देखील तिने काम केले आहे. तसंच 'मन,' 'प्रेम अगन,' 'बायपास रोड,' 'द कॉन्ट्रॅक्ट' यांसारख्या बॉलिवूड सिनेमातही ती झळकली होती.