Rhea Chakraborty | (Photo Credits: Facebook)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सुशांतच्या निधनानंतर बरीच चर्चेत आली. तर तिच्यावर सुशांतच्या चाहत्यांकडून प्रचंड टिका देखील झाली. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.तिला एक बिग बजेट चित्रपट मिळाल्याची चर्चा आहे. महाभारताशी संबंधित एक बिग बजेट चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती द्रौपदीच्या भूमिकेत दिसेल असेही सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनु कपूर आणि इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूजा हे कलाकार काम करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुमी जाफरी हा महाभारताशी संबंधित एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामध्ये त्याने रियाला संधी देण्याचं ठरवलं आहे.हेदेखील वाचा- Janhvi Kapoor Hot Photos: ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूर चा जलवा; हॉटनेसवर चाहते फिदा

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

महाभारताशी संबंधित या चित्रपटातून महाभारत आणि द्रौपदीशी संबंधित विविध आयाम दाखवण्यात येणार आहेत. रुमी जाफरीने सांगितलं की हा चित्रपट आजच्या जगाशी मिळता-जुळता बनवला जाईल. त्यामध्ये मॉडर्न कन्टेंट वापरण्यात येणार आहे.

रिया चक्रवर्तीने आपल्या करियरची सुरुवात 2012 साली एका तेलुगु चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर तिने बँक चोर या हिंदी चित्रपटात काम केलं. त्यानंतर तिने हाफ गर्लफेण्ड, मेरे डॅड की मारुती आणि जलेबी या चित्रपटांत काम केलं. सुशांत सिंह प्रकरणातून बाहेर आल्यानंतर रिया इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधते. ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते.