रणवीर सिंह ला सासरी जाण्यासाठी फॉलो करावा लागतो 'पदुकोण फॅमिली ड्रेसकोड'; वाचा दीपिकाचा खुलासा
Deepika Padukone-Ranveer Sing | (Photo courtesy: archived, edited images)

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि त्याचा जगावेगळा ड्रेसिंग सेन्स यांचे अनेक किस्से आपण ऐकून असाल, पण नीट निरखून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, जेव्हा रणवीर आपली पत्नी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) किंवा तिच्या कुटुंबासोबत असतो तेव्हा त्याचे कपडे अगदीच नॉर्मल असतात. हा काही योगायोग नसून हा रणवीर साठी दीपिका व संपूर्ण पदुकोण कुटुंबाने ठरवून दिलेला नियमच आहे. अलीकडेच दीपिकाने एका मुलाखतीत याबद्दल माहिती देत "रणवीर जेव्हा पदुकोण कुटुंबाला भेटतो तेव्हा त्याला ठरवून दिलेला ड्रेसकोड फॉलो करावा लागतो" असा खुलासा केला.

रणवीरचे कपडे हा विषय बॉलिवूडकरांपासून ते सोशल मीडियापर्यंत आणि थेट त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगणारा विषय आहे. यावरून अनेकदा दीपिकाला सुद्धा टार्गेट करून अनेक सवाल केले जातात. अशाच एका प्रश्नाचे उत्तर देताना दीपिका सांगते की, " रणवीरने बाहेर जेकपडे घालायचे ते आपल्या मनाने ठरवले असले तरी जेव्हा त्याला माझ्या कुटुंबाला म्हणजेच 'पदुकोण' फॅमिलीला भेटायचे असेल तेव्हा त्याला पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स हा नॉर्मल ड्रेसकोड पाळावा लागतो, त्यातही जर का एखादा खास कार्यक्रम असेल तर त्याला काळी किंवा निळी जीन्स, पांढरा शर्ट किंवा राउंड नेक टीशर्ट घालण्यास परवानगी आहे."

पहा काय म्हणाली दीपिका

हे सर्व सांगत असतानाच एका उत्तम पत्नीप्रमाणे दीपिकाने रणवीरची स्तुती करत "तो एक हुशार, भावुक आणि शांत स्वभावाचा सुद्धा व्यक्ती आहे, अनेकदा त्याच्या उत्साहामुळे ही बाजू झाकली जाते पान अनेक दिग्दर्शकांना ती बाजू दिसते आणि त्याच्या कामातून सुद्धा ती झळकते" असे म्हंटले आहे.

रणवीर सिंह चा रेड हुडी मधील अवतार बघून चिमुकली लागली रडायला (Watch Video)

दरम्यान, दीपिका आणि रणवीर लग्नानंतर पहिल्यांदा 83 या सिनेमातून एकत्र समोर येणार आहेत. अलीकडे या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये रणवीर आणि दीपिका पती पत्नीचं भूमिकेत दिसतील.