बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीचा प्रत्यय त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन वारंवार येत असतो. प्रियंका-निक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळते. त्याचबरोबर त्यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र देसी गर्ल या साऱ्याकडे दुर्लक्ष करत बिनधास्त फोटोज शेअर करत असते. असेच रोमँटीक अंदाज असलेले काही खास फोटोज प्रियंकाने शेअर केले आहेत. या फोटोत प्रियंका निकसह वेळ घालवताना दिसत आहे. मात्र तिच्या या हॉट, बोल्ड फोटोजनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Instagram Rich List 2019 मध्ये 'प्रियंका चोप्रा'ची वर्णी; एका इंस्टा पोस्टसाठी मिळतात तब्बल 'इतके' कोटी)
निक सोबतचे हे फोटोज शेअर करताना प्रियंकाने हार्ट इमोजीज वापरले आहे. प्रियंका-निकचे हे फोटोज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
पहा फोटोज:
2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' या सिनेमानंतर लवकरच प्रियंका 'द स्काई इज पिंक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले असून 11 ऑक्टोरबर 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
यापूर्वी प्रियंका, सलमान खान सोबत 'भारत' सिनेमात झळकणार होती. परंतु, तिने साखरपुड्याचे कारण पुढे करत या सिनेमातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर या सिनेमात कैटरीना कैफची वर्णी लागली. विशेष म्हणजे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.