Instagram Rich List 2019 मध्ये 'प्रियंका चोप्रा'ची वर्णी; एका इंस्टा पोस्टसाठी मिळतात तब्बल 'इतके' कोटी
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

देसी गर्ल ते ग्लोबल आयकॉन अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचे नाव इंस्टाग्रामच्या रिच लिस्ट 2019 (Instagram Rich List 2019) मध्ये सहभागी झाले आहे. इंस्टाग्रामचे शेड्युलिंग टूल हॉपर एचक्यू (Hopper HQ) द्वारा ही माहिती देण्यात आली आहे.

प्रियंका सोशल मीडियावर चांगलची अॅक्टीव्ह आहे. इंस्टा पोस्टवरुन ती अनेक ब्रँड्स आणि इतर कमर्शियल्स प्रमोट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिच लिस्टमध्ये प्रियंकाचे 19 वे स्थान आहे. तर याच यादीतील सेलिब्रिटीजच्या सब सेक्शनमध्ये तिचा 16 वा क्रमांक आहे. प्रियंका आपल्या एका कमर्शियल पोस्टसाठी 271,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 1,86,94,393 रुपये आकारते. (बॉलिवूड, हॉलिवूड गाजवणार्‍या प्रियंका चोप्रा ने साकरल्या या दमदार मराठी सिनेकृती)

या यादीत यंदा केवळ दोन भारतीयांनी बाजी मारली आहे. एक म्हणजे प्रियंका चोप्रा आणि दुसरा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली.

अमेरिकन मीडिया पर्सनालिटी आणि बिजनेस वूमन काईली जेनर (Kylie Jenner) हिने इंस्टाग्राम रिच लिस्ट 2019 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. एका इंस्टा पोस्टसाठी तिला तब्बल 8,73,41,973 रुपये मिळतात.

 

View this post on Instagram

 

summer lovin’

A post shared by Kylie ✨ (@kyliejenner) on

2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' सिनेमानंतर लवकरच प्रियंका चोप्रा 'द स्काई इज पिंक' या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.