फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) याने सलग दुसऱ्या वर्षी 2019 च्या इंस्टाग्राम (Instagram) स्पोर्ट्सची समृद्ध यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटूने आपले प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ब्राझिलचा नेमार (Neymar) यांना मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. तर भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. विराट नवव्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोला आपल्या इंस्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टने 784,000 पाउंड म्हणजे 6 करोड 72 लाख 60 हजार 773 भारतीय रुपये कमावतो. त्यानंतर आहे, नेयमार जो 580,000 पौंड कमावतो. आणि 521,000 पौंड कमावत तिसऱ्या क्रमांकावर आहे लिओनेल मेसीने. (ICC Test Ranking: आईसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली याचे अव्वल स्थान कायम तर Team India नंबर वन)
दुसरीकडे, टीम इंडिया कर्णधार विराट आपल्या प्रत्येक पोस्टवर 158,00 पौंड (1 कोटी 35 लाख रुपये) कमावतो. दरम्यान, Instagram वर सर्वात श्रीमंत खेळाडू निर्धारित करण्यासाठी, हूपर एचक्यू (Hopper HQ) सरासरी गुंतवणूकीवर आधारित, सेलिब्रिटीने कितीवेळा पोस्ट केली आणि त्यांच्या फॉलोवर्सची संख्या यावर आधारित डेटाचे विश्लेषण केले जाते. कोहलीचे Instagram वर 36 लाख फॉलोवर्स आहेत. तर त्याच्या तुलनेत रोनाल्डोचे 173 लाख अनुयायी आहेत.
उर्वरित 10 खेळाडूंपैकी चौथ्या स्थानावर डेव्हिड बेकहॅम (David Beckham), पाचव्या स्थानी लेबॉन जेम्स (LeBron James), सातव्या स्थानी रोनाल्डिन्हो (Ronaldinho), आठव्या स्थानी गॅरेथ बाले (Gareth Bale) आणि लुईस सुअरेझ (Luis Suarez) दहाव्या क्रमांकावर आहे. महत्वाचं म्हणजे लोकप्रिय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पैसे कमविण्याच्या बाबतीत फुटबॉल स्टार सर्वाधिक प्रभावशाली असतात. टॉप 10 ऍथलीट्समधील आठ खेळाडू फुटबॉलपटू आहेत. फक्त लेबॉन जेम्स (बास्केटबॉल) आणि कोहली (क्रिकेट) हे सूचीतील एकमेव खेळाडू आहे. तर व्यावसायिक खेळातून निवृत्ती घेतल्यावर देखील बेकहॅम आणि रोनाल्डिन्हो अजूनही सोशल मीडिया पोस्टद्वारे कमाई करत आहे.