क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo )आणि लिओनेल मेस्सी हे अनुक्रमे 39 आणि 37 वर्षांचे आहेत. 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉल खेळाडूंच्या यादीत त्यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे क्रिस्टियानो रोनाल्डो सौदी प्रो लीग क्लब अल नासरसाठी क्लब फुटबॉल खेळतो, तर लिओनेल मेस्सी (Lionel Messi) इंटर मियामीसाठी यूएसएमधून खेळत आहे. (Abhishek Sharma and Sufyan Muqeem Fight: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अभिषेक शर्मा आणि सुफयान मुकीम यांच्यात राडा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी (Watch Video))
रोनाल्डो आणि मेस्सी यांची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगातील सर्वाधिक कमाई करणारे फुटबॉलपटू म्हणून त्यांना मागे टाकण्यासाठी नव्या फुटबॉल पटूंना मोठा घाम गाळावा लागणार आहे. 2024 मधील 10 सर्वाधिक मानधन घेणारे फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या कमाईची जाहीर करण्यात आली. त्यात क्रिस्टियानो रोनाल्डो 2024 मध्ये 2400 कोटी रुपये कमावणार असल्याचे मनूद करण्यात आले आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो (३९) हा या यादीतील सर्वात जास्त वय असलेले फुटबॉलपटू आहे. त्याशिवाय, तो सर्वात जास्त मानधन घेत आहे. रोनाल्डो हा सर्वात प्रतिष्ठित फुटबॉलपटूंपैकी एक आहे. रोनाल्डोने नायके, हर्बालाइफ आणि हूप्सचा ब्रेंडअॅविसीडर आहे. त्याशिवाय स्वतःचे हॉटेल्स आणि अंडरवेअरचे ब्रँड्सही आहेत. त्याचे इस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर 900 दशलक्ष सोशल मीडिया फॉलोअर्स आहे.
ऑगस्टमध्ये रोनाल्डोने यूट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे सोशलमिडियावर सक्रीय झाला आहे. यूट्यूब चॅनल सुरू होताच अवघ्या 90 मिनिटात त त्याचे 1 दशलक्ष सवक्रायबर झाले आहे. 'यूआर क्रिस्टियानो' ने तेव्हापासून त्याचे प्रेक्षक जवळपास 65 दशलक्ष झाले आहेत. त्याच्या फक्त 59 व्हिडिओंना 544 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.