ICC Test Ranking: आईसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली याचे अव्वल स्थान कायम तर Team India नंबर वन
Virat Kohli (Photo Credits: Getty Images)

ICC Test Ranking: आईसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत कोहली 922 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (913) दुसऱ्या आणि चेतेश्वर पुजारा (881) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कसोटी संघाच्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड (2) आणि दक्षिण आफ्रिका (3) इंग्लंड (4) आणि ऑस्ट्रेलिया (5) हे संघ टॉप 5 मध्ये आहेत. या संघानंतर क्रमवारीत श्रीलंका, पाकिस्तान, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे.

तर फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ चौथ्या, न्युझीलंडचा हेनरी निकल्स पाचव्या, इंग्लंडचा जोए रुट सहाव्या आणि ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला सातवे स्थान मिळाले आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू एडन मकर्रम, क्विंटन डी कॉक आणि फाफ डुप्लेसी क्रमश: आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जर्सीवर असणार खेळाडूंचे नाव आणि नंबर, पहा हे (Photos)

गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस प्रथम स्थानी तर इंग्लंडचा जेम्स एंडरसन दुसऱ्या स्थानी आहे, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या स्थानावर असून तर टॉप 10 मध्ये भारताच्या दोन गोलंदाजांचा समावेश आहे. या यादीत भारताचे रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन क्रमशः सहाव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

याशिवाय वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर हा जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर ठरला असून बांग्लादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानी तर भारताचा रवींद्र जडेजा याला तिसरे स्थान पटकवण्यात यश आले आहे.