Priyanka Chopra (Photo Credits: Instagram/@team_pc)

 Priyanka Chopra 37 th Birthday Special: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आज तिचा 37 वा बर्थ डे साजरा करत आहे. निक जोनास सोबत विवाहबद्ध झालेली प्रियंका सध्या अमेरिकेतील न्युयॉर्क मध्ये राहत असली तरीही तिच्यामधील 'देसी गर्ल' प्रियंकाने जपली आहे. 2000 साली Miss World ठरलेली प्रियंका बॉलिवूडमध्ये आली. 'द हिरो' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र डॉन, बर्फीअशा बॉलिवूडच्या तिच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला पण सोबतच प्रियंकाच्या नावाची दखल घेण्यासही भाग पाडलं. पुढे हॉलिवूडमध्येही प्रियंकाने आपली छाप पाडली. पण या सार्‍या ग्लॅमरस आणि झगमत्या जगात वावरतानाही तिला मराठी सिनेमा आणि निर्मितीची भुरळ पडली. यामधून प्रियंकाने मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं नशीब आजमवत स्वत: ला सिद्धही केलं.

प्रियंका चोप्राच्या मराठी सिनेमा कलाकृती

व्हेंटिलेटर

2016 साली राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' या सिनेमाच्या माध्यमातून प्रियंका चोप्राने मराठी सिनेमसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमाची सिनेमाची निर्मिती प्रियंकाने आई मधू चोप्रा यांच्यासोबत निर्माती म्हणून केली. या सिनेमात प्रियंकाची कॅमिओ म्हणून झलकही पहायला मिळते. व्हेंटिलेटर सिनेमाने त्या वर्षाच्या नॅशनल अवॉर्ड्सवर छाप पाडली होती.

बाबा गाण्यातून गायिका म्हणून पदार्पण

'बाबा' या व्हेटिंलर सिनेमातील हळव्या मराठी गाण्यातून प्रियंकाने गायिका म्हणून तिची चुणूक दाखवली. भाषा, उच्चार या पलिकडे भावना आणि संगीत या सार्‍या सीमा रेषा पलिकडे जातं हे तिनं या गाण्यातून दाखवून दिलं. प्रियंकाच्या वडिलांच्या निधनानंतर तिने त्यांना अर्पण केलेलं हे खास मराठी गाणं होतं.

फायरब्रॅन्ड

नेटफ्लिक्सच्या सिनेनिर्मितीमध्येही प्रियंका चोप्राने फायरब्रॅन्ड या मराठी सिनेमाची निर्मिती केली. महिलांच्या सबलीकरणावर भाष्य करणारा 'फायरब्रॅन्ड' या सिनेमामध्ये उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव हे कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत होते. Firebrand Trailer: Netflix वर  रीलिज झालेल्या Priyanka Chopra निर्मित पहिला मराठी सिनेमा, पहा दमदार ट्रेलरची खास झलक

पाणी

पाणी या मराठी सिनेमाची निर्मिती प्रियंका चोप्राने केली होती. मराठवाड्यातील दुष्काळाचं भीषण वास्ताव या सिनेमात मांडण्यात आलं होतं. एका सत्यकथेच्या आधारे रचलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे याने केलं आहे.

मराठी सिनेमाची भुरळ प्रियंका प्रमाणेच अनेक बॉलिवूड स्टार्सना पडली आहे. त्यामुळे दर्जेदार विषयांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. डिसेंबर 2018 मध्ये प्रियंका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत विवाहबद्ध झाली. यंदाचा तिचा बर्थ डे हा लग्नानंतर पहिलाच बर्थ डे असल्याने खास असेल हे नक्कीच.